आपला जिल्हा
जनता दरबारातील ‘त्या’ फोनचा परिणाम; आमदार राजूभैय्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दादरा रस्त्याचे काम अखेर मार्गी!
संपादक हरनामसिंग चव्हाण

जनता दरबारातील ‘त्या’ फोनचा परिणाम; आमदार राजूभैय्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे दादरा रस्त्याचे काम अखेर मार्गी!
माहेरा कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मॅनेजरने केली पाहणी; नगरसेवक सचिन दगडू आणि धनंजय गोरे मैदानात
वसमत CT NEWS
संपादक: हरनामसिंग चव्हाण
- वसमत:
काही दिवसांपूर्वी जनता दरबारात बोलताना आमदार राजूभैय्या नवघरे यांनी वसमत ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील ‘दादरा’ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. फोनवरूनच त्यांनी संबंधित अधिकारी आणि गुत्तेदाराला चांगलेच धारेवर धरले होते. आमदार साहेबांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचा अखेर ‘धडाकेबाज परिणाम’ पाहायला मिळाला आहे.
आमदार नवघरे यांच्या इशाऱ्यानंतर आज रोजी ‘माहेरा कन्स्ट्रक्शन’चे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील कुमार यांनी तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी येत खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच, येत्या सोमवारपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
नगरसेवकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवल्या त्रुटी
आमदार साहेबांच्या सूचनेनुसार, वसमतचे नगरसेवक तथा गटनेते सचिनभाऊ दगडू आणि नगरसेवक धनंजय गोरे यांनी प्रोजेक्ट मॅनेजर सुनील कुमार यांच्यासोबत संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची दुरुस्ती करताना तांत्रिकदृष्ट्या काय काय करणे गरजेचे आहे, खड्डे कसे बुजवायचे आणि रस्ता कसा दर्जेदार करायचा, याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन मॅनेजरला सर्व बाबी दाखवून दिल्या.
काम वेगाने होणार: मॅनेजरची ग्वाही
नगरसेवक सचिन दगडू आणि धनंजय गोरे यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर माहेरा कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर
सुनील कुमार यांनी नमती भूमिका घेतली. “रस्त्याची दुरुस्ती अत्यंत वेगाने केली जाईल आणि प्रवाशांची अडचण दूर केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
थोडक्यात पण महत्त्वाचे… जनता दरबारात आमदार राजूभैय्या नवघरे यांनी जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाला धारेवर धरले होते. आमदार साहेबांच्या याच खमक्या आणि लोकहितैषी भूमिकेमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या वसमत-परभणी दादरा रस्त्याचा प्रश्न अखेर सुटत आहे. सोमवारपासून कामाला सुरुवात होत असल्याने नागरिकांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत.




