आपला जिल्हा

आमदार राजू भैय्या यांच्या कडून अमित काबरा यांना जिल्हाध्यक्ष निवडीचा शुभेच्छा व ठिकठिकाणी त्यांचे जोरदार सत्कार!

मुख्य संपादक रामु चव्हाण

आमदार राजू भैय्या यांच्या कडून अमित काबरा यांना जिल्हाध्यक्ष निवडीचा शुभेच्छा व ठिकठिकाणी त्यांचे जोरदार सत्कार!

वसमत / हरनामसिंग चव्हाण

महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, यामध्ये इंजि. अमितकुमार काबरा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आमदार राजू भय्या यांच्याकडून विशेष शुभेच्छा दिले
इंजि. अमितकुमार काबरा यांच्या निवडीची घोषणा होताच, माननीय आमदार राजू भय्या त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. काबरा यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनचे काम अधिक मजबूत होईल आणि इंजिनिअर्सच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास आमदार महोदयांनी यावेळी व्यक्त केला.
ठिकठिकाणी जोरदार स्वागत व सत्कार
बिनविरोध निवडीचे वृत्त समजताच हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी आणि असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र येत जल्लोष केला.
प्रमुख उपस्थिती मित्र आणि पदाधिकारी काशिनाथ भोसले पाटील,सुरेश धोत्रे, मारिअन्ना वाघमारे, उत्तम ठाकरे,पपू आजादे, संदीप जोंधले, चंद्रमुनी मस्के, मनोज चव्हाण, पिंटू महाकाळे, अंभोरे सर, गजानन नवघरे,यांनीही इंजि. काबरा यांचा जाहीर सत्कार केला व पुढील कार्यास पाठिंबा दर्शवला.
जल्लोषाचे वातावरण: विविध ठिकाणी काबरा यांचे हार, तुरे आणि पुष्पगुच्छ देऊन ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. “असोसिएशनने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. सर्व इंजिनिअर बांधवांना सोबत घेऊन संघटनेच्या बळकटीसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मी सदैव तत्पर राहीन.”
इंजि. अमितकुमार काबरा (नवनियुक्त जिल्हाध्यक्ष)
या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी इंजि. अमितकुमार काबरा यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!