आपला जिल्हा

वाढत्या उन्हाचा कडाका: ईदगाह मैदानावर डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात करण्याची मोईन कादरी यांची प्रशासनाकडे मागणी

संपादक हरनामसिंग चव्हाण

वाढत्या उन्हाचा कडाका: ईदगाह मैदानावर डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात करण्याची मोईन कादरी यांची प्रशासनाकडे मागणी

वसमत CT NEWS

वसमत ईदगाह मैदान
आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी येणाऱ्या हजारो मुस्लिम बांधवांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता, तेथे तात्काळ डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका (Ambulance) तैनात करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोईन कादरी यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भातील एक निवेदनही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
सध्या देशभरासह स्थानिक पातळीवर उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. दुपारच्या सुमारास उष्माघाताचा (Heat Stroke) मोठा धोका निर्माण झाला आहे. ईद निमित्त आयोजित सामूहिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर दरवर्षी बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो भाविक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या वाढत्या उष्णतेमुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच दक्षता घेणे गरजेचे असल्याचे कादरी यांनी निवेदनात म्हटले आहे.

“वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध आणि लहान बालकांच्या आरोग्याची चिंता सतावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ईदगाह मैदानावर प्राथमिक उपचारांसाठी डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका सज्ज ठेवावी, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळेल.”

मोईन कादरी (पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते)

ऐनवेळी कोणाची प्रकृती बिघडल्यास कोणतीही धावपळ न होता जागेवरच तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत, हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे. ईदच्या पवित्र सणादिवशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी प्रशासन या मागणीची गंभीर दखल घेऊन सकारात्मक पावले उचलेल, अशी आशा मोईन कादरी यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!