आपला जिल्हा

नहाद नगरीत आज भव्य बुद्ध मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा; विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

वसमत CT NEWS

नहाद नगरीत आज भव्य बुद्ध मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा; विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

वसमत CT NEWS
वसमत (विशेष प्रतिनिधी):

तालुक्यातील नहाद येथे आज, गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी ‘आनंद बुद्ध विहार’ परिसरात भव्य बुद्ध मूर्ती स्थापना (कलशारोहण) सोहळा अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या मंगलप्रसंगी दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक
या सोहळ्याचे धम्मदेसक व मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत पंच्याबोधी स्थविर (संचालक, श्रामनेर प्रशिक्षण केंद्र, खुरगाव ता.जि. नांदेड) लाभले आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत विधानसभेचे आमदार मा.श्री. चंद्रकांत उर्फ राजुभैय्या नवघरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, बौद्ध उपासक-उपासिका आणि समस्त गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सोहळ्याची रुपरेषा (आजचे कार्यक्रम)
बुद्ध विहाराचे शिल्पकार दिगंबर कुंडलीक काशिदे आणि विहाराच्या समितीने दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
सकाळी ०७.३५ वा. : धम्मध्वजारोहण आणि त्रिशरण-पंचशील ग्रहण.
दुपारी ०३.०० वा. : भव्य बुद्ध मूर्ती स्थापना (कलशारोहण) सोहळा व भव्य मिरवणूक.
दुपारी ०४.०० वा. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व जाहीर सभा.
सायंकाळी ०६.०० वा.: सम्यक भोजन (महाप्रसाद).
रात्री ०८.०० वा.: प्रसिद्ध भीम शाहीर व प्रबोधनकार माधव दादा वाढवे आणि संच (हदगाव, जि. नांदेड) यांच्या सुश्राव्य भीम गीतांचा आणि प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम.

विशेष टीप: नहाद हे गाव जवळा बाजार येथून पूर्व दिशेला साधारण १० कि.मी. अंतरावर आहे.

या ऐतिहासिक आणि कौतुकास्पद सोहळ्याला परिसरातील सर्व बौद्ध धम्म बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन अध्यक्ष व समस्त कमिटी सदस्य, आनंद बुद्ध विहार, नहाद तसेच समस्त नहाद ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!