आपला जिल्हा

स्वराज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने हिंगोलीचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांचा सत्कार

नागेश चव्हाण

स्वराज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने हिंगोलीचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांचा सत्कार

वसमत CT NEWS

हिंगोली येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात आज, दिनांक २९ मे २०२६ रोजी, हिंगोली जिल्ह्याचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी साहेबांचा स्वराज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

  • धर्माधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या प्रशासकीय सेवेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
    याप्रसंगी स्वराज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये स्वराज्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश जावळे सर, राज्य समन्वयक विशाल जाधव सर, जिल्हाध्यक्ष अविनाश पवार सर, संपर्कप्रमुख गिरी सर, उपाध्यक्ष बोडखे सर, सचिव भुसारी सर, सहसचिव दवणे सर, कोषाध्यक्ष पाईकराव सर, सह कोषाध्यक्ष अनिल राठोड सर, मार्गदर्शक व्ही. एन. पिंपळपल्ले सर आणि समन्वयक पी. डी. कदम सर यांचा प्रामुख्याने समावेश होता.
    या सत्कार समारंभाच्या वेळी स्वराज्य शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे इतर सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि आदरायुक्त वातावरणात हा सोहळा पार पडला. संघटनेच्या वतीने धर्माधिकारी साहेबांना पुढील वाटचालीस व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!