आपला जिल्हाक्राईम स्टोरी

पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘महिला दक्षता समिती’ बैठक संपन्न; पीडित महिला व मुलींच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळण्याचे निर्देश

मुख्य संपादक रामु चव्हाण

 पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘महिला दक्षता समिती’ बैठक संपन्न; पीडित महिला व मुलींच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळण्याचे निर्देश

हिंगोली (विशेष प्रतिनिधी): वसमत सि.टी.न्यूज

पोलीस स्टेशन स्तरावर तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना अत्यंत सौजन्याची वागणूक देणे, महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची विनाविलंब दखल घेणे, तसेच पीडित महिला व मुलींच्या तक्रारी संवेदनशीलतेने हाताळणे याकरिता समाजातील विविध घटकांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. याच मुख्य उद्देशाने मा. अपर पोलीस महासंचालक (म.बा.प्र.वि., म.रा. मुंबई) यांच्या सूचनेनुसार व मा. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय तसेच जिल्ह्यातील सर्व १३ पोलीस स्टेशन अंतर्गत नेमण्यात आलेल्या ‘महिला दक्षता समिती’ मधील सदस्य व सचिव यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.

सदर बैठक दिनांक ३० मे २०२६ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. निलाभ रोहन सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन व कायदेशीर बाबींवर चर्चा

या बैठकीमध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा महिला दक्षता समिती सदस्य तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्री. दिपक डोणेकर, विधी अधिकारी श्रीमती अनुसया पंडित, आणि केंद्रीय शाळा शिक्षिका श्रीमती मिरा गणगे यांनी विविध सामाजिक, मानसिक व कायदेशीर पैलूंवर प्रकाश टाकला व उपस्थित सर्व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

महिला समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची: पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन

बैठकीप्रसंगी बोलताना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये केवळ कायदेशीर कारवाई करून चालणार नाही, तर तक्रार घेण्यापासून ते पीडितेला मानसिक पाठबळ देणे, वैद्यकीय मदत पुरवणे आणि आवश्यकतेनुसार निवारा मदत मिळवून देणे या सर्व बाबींमध्ये महिला समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील आहे. पोलीस प्रशासन महिलांच्या सुरक्षेसाठी व हक्कासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह समिती सदस्यांची मोठी उपस्थिती

सदर बैठकीस जिल्हा महिला दक्षता समितीचे अध्यक्ष तथा मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री. डॉ. निलाभ रोहन सर, सचिव तथा पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. केंद्रे, महिला पोलीस निरीक्षक शालिनी नाईक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीचे सन्माननीय सदस्य, सचिव, दुय्यम अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्रीमती सपोनि. प्रेमलता जगताप यांनी केले. तसेच, बैठकीचे उत्तम नियोजन व आयोजन भरोसा सेलचे पोउपनि श्री. शेख, मसपोउपनि श्रीमती पेंदोर, मपोह/अनिता जाधव, मपोना/सिमा पाटिल, मपोशि/घुमनर आणि समुपदेशक श्री. खोडवे इत्यादींनी परिश्रमपूर्वक केले.

 तक्रारींची दखल: महिलांच्या तक्रारींवर विनाविलंब आणि तातडीने कारवाई करण्याचे निर्देश.

 चौफेर मदत: केवळ गुन्हा नोंदवणे नव्हे, तर पीडित महिलांना मानसिक, वैद्यकीय व निवारा मदत मिळवून देणे महत्त्वाचे.

 समितीचा सहभाग: जिल्ह्यातील सर्व १३ पोलीस स्टेशनमधील महिला दक्षता समिती सदस्यांचा सक्रिय सहभाग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!