आपला जिल्हा

राजीव नंद साहेबांचा वसमत उपविभागात भव्य सत्कार; आमदार, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती कार्यक्षम अधिकारी राजीव नंद यांना वसमत महावितरणकडून निरोप; आमदार राजू भैय्या नवघरेंकडून विशेष सत्कार

संपादक हरनामसिंग चव्हाण

राजीव नंद साहेबांचा वसमत उपविभागात भव्य सत्कार; आमदार, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती
कार्यक्षम अधिकारी राजीव नंद यांना वसमत महावितरणकडून निरोप; आमदार राजू भैय्या नवघरेंकडून विशेष सत्कार

वसमत (विशेष प्रतिनिधी):
वसमत महावितरण उपविभाग कार्यालयाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री. राजीव नंद साहेब यांची त्यांच्या इच्छित स्थळी बदली झाल्याबद्दल, वसमत उपविभाग कार्यालयाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम उत्साहात व भावूक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून वसमत मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी देखील श्री. नंद साहेब यांच्या उत्कृष्ट कार्यकाळाचा गौरव करत त्यांचा विशेष सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून औंढा नागनाथ येथील प्रभारी उपकार्यकारी अभियंता श्री. रणवीर साहेब, तसेच सहाय्यक अभियंता किरण मोरे साहेब, मंत्री साहेब, खुडे साहेब, कोकाटे साहेब, मोरकडे साहेब आणि केंडे साहेब उपस्थित होते.
तसेच वसमत शहराचे उपनगराध्यक्ष इम्रान अली कॉन्ट्रॅक्टर, वसमत उपविभाग तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा वसमत पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन चव्हाण यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री. नंद साहेब यांच्या कामाचे कौतुक केले.
कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती
राजीव नंद साहेब यांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली. या निरोप समारंभासाठी वसमत उपविभागातील सर्व अधिकारी, इंजिनिअर्स तसेच महावितरणचा महिला कर्मचारी वर्ग अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी नंद साहेब यांच्यासोबतचे अनुभव सांगत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
छाया व वृत्त: नागेश चव्हाण, वसमत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia