९२-वसमत विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) संदर्भात बैठक संपन्न; ‘हर घर संविधान’ मोहिमेअंतर्गत उद्देशिकांचे वाटप
संपादक हरनामसिंग चव्हाण

९२-वसमत विधानसभा मतदारसंघात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) संदर्भात बैठक संपन्न; ‘हर घर संविधान’ मोहिमेअंतर्गत उद्देशिकांचे वाटप
वसमत (CT NEWS ):
वसमत नगरपरिषद कार्यालयात आज दिनांक ०२/०७/२००६ रोजी ९२-वसमत विधानसभा मतदारसंघांतर्गत सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. मा. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, ९२-वसमत विधानसभा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नगरपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
मतदार यादी पुनरीक्षणाबाबत (SIR) महत्त्वाच्या सूचना
या बैठकीत SIR (विशेष सखोल पुनरीक्षण) अंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली. आपापल्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला या मोहिमेची माहिती द्यावी, तसेच संबंधित मतदारांकडून BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांनी दिलेले EF FORM भरून ते संबंधित नियुक्त BLO कडे जमा करावेत, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. नगरपरिषदेच्या सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व शंकांवर या वेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हा SIR कार्यक्रम अत्यंत मर्यादित मुदतीत पूर्ण करावयाचा असल्याने, वसमत शहरातील सर्व BLO आणि पर्यवेक्षकांनी हे काम सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिले.
‘हर घर संविधान’ अभियानांतर्गत उद्देशिकांचे वाटप
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समाज कल्याण अधिकारी, हिंगोली यांच्याकडून ‘हर घर संविधान’ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या संविधानाच्या उद्देशिकांचे (Preamble) वाटप मा. उपविभागीय अधिकारी वसमत व मा. अध्यक्षा नगरपरिषद वसमत यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या सर्व सदस्यांना करण्यात आले.
बैठकीला उपस्थित मान्यवर
या महत्त्वपूर्ण बैठकीला वसमत नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. सुनिता मनमोहन बाहेती, सय्यद इम्रान अली नासेर अली, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. आशुतोष चिंचाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यासोबतच नगरपरिषदेचे सन्माननीय सदस्य व त्यांचे प्रतिनिधी अनुक्रमे: राजेश पवार, काशीनाथ भोसले, डॉ. रेणुकाताई पंतगे, सचिन दगडू, संकेत नामपल्ली राजकुमार एंगडे, प्रभाकर श्रीसागर, नय्युम पाशा, स्नेहा मनोहरे, जोती वाहुळे, शेख हारुण शेख जाहिराबी जिलानी यांचे प्रतिनिधी म्हणून जावेद खुरेशी इत्यादी उपस्थित होते. तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. नागनाथ देशमुख (शहर अभियंता), श्री. अरविंद शिकारी, दाजीबा भोसले, ज्ञानेश्वर जाधव, बालाजी सोनवणे व इतर कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते.



