आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या उपस्थितीत टोकाई गडावर श्री टोकाई माता मूर्ती स्थलांतर व स्थापना सोहळा संपन्न; विधिवत महापूजा करून घेतले दर्शन!

संपादक हरनामसिंग चव्हाण

आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या उपस्थितीत टोकाई गडावर श्री टोकाई माता मूर्ती स्थलांतर व स्थापना सोहळा संपन्न; विधिवत महापूजा करून घेतले दर्शन!

(वसमत CT NEWS संपादक हरनामसिंग चव्हाण ):


टोकाई गड येथील प्रसिद्ध श्री टोकाई माता मंदिराच्या हेमाडपंती शैलीतील भव्य नूतन मंदिराच्या उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर गडावर अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात श्री टोकाई माता मूर्ती स्थलांतर व स्थापना सोहळा नुकताच संपन्न झाला. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गडावर हजेरी लावली होती.
या सोहळ्यास क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून श्री टोकाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि माता माऊलीची विधिवत महापूजा अर्चा करून सुख-समृद्धीचे साकडे घातले.
संत-महंत आणि मान्यवरांची मांदियाळी
या पवित्र सोहळ्याला अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये:
आत्मानंद महाराज,विश्वचैतन्य महाराज आष्टीकर,महंत गुरुबाबा,उमा माई,बालुमामा ढोरे,सचिन भोसले,मुंजाजीराव दळवी,राजू पाटील इंगोले,आशीर्वाद इंगोले,आनंद बडवणे,कदम सर
यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि आई टोकाई मातेचे हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य हेमाडपंती मंदिराचा संकल्प
याप्रसंगी बोलताना आमदार राजू भैय्या नवघरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “टोकाई गड हे आपल्या भागातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे. येथे सुरू असलेले हेमाडपंती शैलीतील भव्य मंदिराचे उभारणीचे कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि हे पवित्र देवस्थान अधिक भव्य-दिव्य स्वरूपात भाविकांच्या सेवेत दाखल व्हावे, हीच आई टोकाई मातेच्या चरणी प्रार्थना आहे.”
तसेच, आई टोकाई माताच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय आशीर्वाद लाभोत, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मूर्ती स्थापना सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध आणि मांगल्याच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!