अर्थकारणआपला जिल्हाताज्या घडामोडी

वसमतचे ‘कार्यसम्राट’ आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; हट्टा येथे भव्य एस.टी. बसस्थानकाचे उद्घाटन!

संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमतचे ‘कार्यसम्राट’ आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; हट्टा येथे भव्य एस.टी. बसस्थानकाचे उद्घाटन!

वसमत (प्रतिनिधी):
वसमत मतदारसंघाचे लोकप्रिय आणि धडाडीचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. तालुक्यातील मौजे हट्टा येथे ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांची मागणी लक्षात घेऊन आमदार नवघरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नवीन एस.टी. बसस्थानकाची मागणी केली होती. या मागणीला दोन कोठी चालीस लक्ष रुपये मंजुरी मिळाल्यानंतर, आज रोजी आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते या भव्य बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटात संपन्न झाला.
हट्टा परिसरातील प्रवाशांची, विशेषतः विद्यार्थी, महिला आणि नोकरदारांची यामुळे मोठी गैरसोय दूर होणार असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रमुख उपस्थिती खालीलप्रमाणे होती:
सचिन भोसले,
बाळूमामा ढोरे,
विनोद आंबोरे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती)
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, हट्टा गावाचे सरपंच, उपसरपंच.
विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मौजे हट्टा येथील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांकडून आमदार नवघरे यांचे आभार
“हट्टा येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र आमदार राजूभैय्या नवघरे यांनी त्यांच्या ‘कार्यसम्राट’ कल्पकतेतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लावला.”अशा भावना यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. उद्घाटन सोहळ्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने आमदार नवघरे व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

छायाचित्र व वृत्त: नागेश चव्हाण, वसमत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!