आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिक्षण, आरोग्य व स्मशानभूमीला प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव सादर करा: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

संपादक हरनामसिंग चव्हाण

शिक्षण, आरोग्य व स्मशानभूमीला प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव सादर करा: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

वसमत CT NEWS

हिंगोली:
जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि ‘गाव तेथे स्मशानभूमी’ या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देऊन निधीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. पालकमंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध खासदार, आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व मुद्दे:
कारवाईचे निर्देश: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील दिरंगाईबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले.
पायाभूत सुविधा: अकोला रोडवरील रेल्वे पुलाचे भूसंपादन गतिमान करणे, वनतळे विकास, महावितरणला निधी आणि लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा प्रस्तावात समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वार्षिक नियोजन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चालू वर्षाच्या ३३८ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा आढावा सादर केला. जिल्ह्यात हळद गोदामांची उभारणी, औषध खरेदीसाठी अतिरिक्त निधी, शेतरस्त्यांच्या मोजणीसाठी ३० सर्वेअरची नियुक्ती, मुख्य शहरांत सीसीटीव्ही यंत्रणा आणि क्रीडांगण विकासाचे कामे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.
उपयोजना निधी: अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५३ कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी २६ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीचा आढावा घेण्यात आला.
तीर्थक्षेत्रांना दर्जा: हिंगोली, कळमनुरी व वसमत मतदारसंघातील एकूण १५ तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्गाचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी शाळांची दुरुस्ती, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा बळकटीकरण, ग्रामीण रस्ते आणि महावितरणसाठी वाढीव निधी देण्याबाबत विविध मागण्या व सूचना मांडल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!