आपला जिल्हासामाजिक

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश! महान अभिनेते दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसमत येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

संपादक हरनामसिंग चव्हाण

‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश! महान अभिनेते दिलीप कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त वसमत येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

वसमत CT NEWS

वसमत (प्रतिनिधी):
हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते, ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून जगभर ओळखले जाणारे पद्मभूषण दिलीप कुमार उर्फ युसुफ खान साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी वसमत येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ‘दिलीप कुमार फाउंडेशन’च्या वतीने आयोजित या मानवतेसाठी प्रेरणादायी उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
स्थानिक हजरत खान-ए-आलम उर्दू हायस्कूल, झेंडा चौक, वसमत येथे सकाळी ११.०० वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाली. “माणुसकी, प्रेम आणि रक्ताचे नाते खूप जुने आहे. ज्याच्या हृदयात जीव आहे, तोच रक्त देतो,” या दिलीप कुमार साहेबांच्याच प्रेरणादायी विचारांना अभिवादन करत या पवित्र कार्याची सुरुवात करण्यात आली.
अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमिया आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्ताची सतत आवश्यकता असते. हीच सामाजिक जबाबदारी ओळखून ‘रक्तदान करा, जीवनदान द्या’, ‘आपले थोडेसे दान, कुणाच्या जीवनाची मोठी शान’ आणि ‘रक्तदान करा, मानवता वाचवा’ अशा विविध घोषणा देत नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या समाजोपयोगी उपक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेटी देऊन आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यामध्ये प्रामुख्याने:
माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल हाफिस साहेब
नंदिग्राम ब्लड सेंटरच्या संचालिका श्वेता वानखेडे मॅडम
मोहम्मद बिलाल सर
विष्णू गाडे सर
कुलदीप राजभोज
बजरंग शेंबोले
आदित्य तोंडे
योगेश कटारे
शेख सानिया
शितल
शिव प्रसाद महाजन
यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तरुण-तरुणी आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. दिलीप कुमार फाउंडेशनच्या वतीने या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

छायाचित्र सौजन्य: नागेश चव्हाण, वसमत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!