वसमत ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा; १.२१ लाखांच्या मुद्देमालासह ४ जणांना रंगेहात अटक!
संपादक हरनामसिंग चव्हाण

वसमत ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा; १.२१ लाखांच्या मुद्देमालासह ४ जणांना रंगेहात अटक!
वसमत CT NEWS
वसमत:
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंज शिवारामध्ये सुरू असलेल्या ‘झन्ना मन्ना’ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी ६ वाजता धडक कारवाई केली. ज्ञानेश्वर माखणे यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी ४ आरोपींना रंगेहात अटक केली आहे.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण: १,२१,६०० रुपये):
नगदी रोकड: १७,६०० रुपये
मोबाईल: विवो आणि ओपो कंपनीचे ३ मोबाईल (किंमत २९,००० रुपये)
वाहने: एक बजाज पल्सर आणि एक पॅशन प्रो मोटरसायकल (किंमत ७५,००० रुपये)
इतर: जुगाराचे साहित्य (५२ पत्ते)
गुन्हा दाखल व तपास: सपोनि रामदास निरदोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. १८६/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सपोउपनि चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोउपनि मिरासे करत आहेत.
“बेकायदेशीर जुगार व मटका चालवणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.



