आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

अंध क्रिकेटपटू गंगा कदमला शासकीय नोकरी मिळावी म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

संपादक: हरनामसिंग चव्हाण

अंध क्रिकेटपटू गंगा कदमला शासकीय नोकरी मिळावी म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

वसमत:
“माझी माणसं, माझी जबाबदारी” या भावनेतून वसमत आणि हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार राजूभैया नवघरे यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील आणि जिल्ह्याचा मान वाढवणाऱ्या एका प्रतिभावान खेळाडूसाठी थेट मंत्रालयात धाव घेतली आहे. जागतिक अंध क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम हिच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा सन्मान करत, तिला क्रीडा कोट्यातून तात्काळ सरकारी नोकरी मिळावी, यासाठी आमदार राजूभैया नवघरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.
जागतिक स्तरावर देशाची आणि पर्यायाने हिंगोली जिल्ह्याची मान अभिमानाने उंचवणाऱ्या गंगा कदम हिच्या कार्याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे, ही भूमिका आमदार नवघरे यांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर अत्यंत आग्रहीपणे मांडली. गंगा कदमच्या नियुक्तीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन देत, तिला लवकरात लवकर शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली.
आमदार राजूभैया नवघरे यांच्या या आग्रही आणि संवेदनशील मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या प्रकरणात शासन पातळीवर तात्काळ योग्य ती पुढील कार्यवाही करून गंगा कदमला न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी बोलताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले, “वसमत तसेच आपल्या संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती जेव्हा माझ्याकडे हक्काने काम घेऊन येते, तेव्हा त्या कामाला शेवटपर्यंत नेऊन ते मार्गी लावण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो. गंगा कदमने जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे, तिला तिचा हक्क मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे.”
आमदार नवघरे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे हिंगोली आणि वसमत परिसरातील क्रीडाप्रेमींमधून व नागरिकांमधून त्यांचे विशेष कौतुक होत असून, गंगा कदमला लवकरच शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!