आपला जिल्हाक्राईम स्टोरी

वसमत येथे कत्तलीच्या उद्देशाने शेतात डांबलेले 19 जनावरे पोलिसांच्या ताब्यात,नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा च्या शेतात पोलिसांची धाड

वसमत येथे कत्तलीच्या उद्देशाने शेतात डांबलेले 19 जनावरे पोलिसांच्या ताब्यात,नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा च्या शेतात पोलिसांची धाड

वसमत /

वसमतच्या नगर परिसदेचे उपाध्यक्षा च्या शेतात पोलिसांची मोठी कारवाई करत डांबुन ठेवलेले व कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेले ! 19 जनावरांची सुटका; करण्यात आली आहे
यामुळेच वसमत च्या राजकीय वर्तुळात प्रचंड भुकंप झाला आहे.,

वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन रोड वरील एका शेतात निर्दयीपणे चा-याची कोणतीही व्यवस्था नसतांना क्रुरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल १९ जनावरांची वसमत ग्रामीण पोलिसांनी वेळेवर धाड टाकून सुटका केली आहे. या धडक कारवाईत १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे पशुधन जप्त करण्यात आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात वसमतचे विद्यमान नगर उपाध्यक्ष सैय्यद इम्रान सैय्यद नाशेरअली यांच्यावर थेट प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने वसमतच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात (शेत गट क्र. ३२) कत्तलीच्या हेतूने जनावरे अत्यंत हालअपेष्टेत डांबून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या समारास पोलिसांनी धाड टाकली.
अंदाजे किंमत ₹ 163000/ (१ लाख ६३ हजार रुपये)

शेत गट क्र. ३२, जवळा खंदारबन शिवार नगर परिषद उपाध्यक्षांवर गंभीर कलमांन्वये गुन्हा या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आरिफ बशीर दोसानी (बॅज नं. ८२) यांच्या फिर्यादीवरून थेट नगर उपाध्यक्ष सैय्यद इम्रान सैय्यद नाशेरअली (रा. वसमत) याच्यावर खालील कडक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५: कलम ५ (अ), ५(क), ९

प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०: कलम 33(2)(3sqrt(14)) (एफ), (एच)

राजकीय वर्तुळात खळबळ; पुढील तपास सुरू एका जबाबदार लोकप्रतिनिधीवर आणि नगरपालिकेच्या विद्यमान उपाध्यक्षांवर अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सदर गुन्हा सहायक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार उपरे (बॅज नं. ११८) करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!