वसमत विधानसभेचे सन्माननीय आमदार राजू भैया नवघरे यांनी आज दिव्यांगांना आधार बनत 596 जणांना दिव्यांग साहित्याचे मोफत वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
आमदार राजुभैया नवघरे यांच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाने तसेच सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय व सामाजिक न्याय व अधिकारीता विभाग आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग माध्यमातून व एडीप योजनेअंतर्गत सामाजिक अधिकारीता शिबीर आज आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन मा.मंत्री तथा साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिरा माध्यमातुन दिव्यांगांना सहायक उपकरणांचे निःशुल्क रित्या वितरण करण्यात आले असून एकूण 596 लाभार्थ्यांना या शिबरातून लाभ मिळाला आहे. सहायक उपकरणांमध्ये दिव्यांगांना सायकल, व्हील चेअर, स्टिक, दिव्यांग किट, गाडे, आदी साहित्य वाटप करण्यात आले.
दिव्यांग समाज बांधव हे समाजाच्या मुख्य प्रवाहातून अतिशय पिछाडलेले असल्याकारणाने व शारीरिकरित्या असक्षम असल्याने अशा प्रकारच्या सहाय्यक उपकरणांची त्यांना अत्यंत आवश्यकता असते. त्यांचे जीवन हे अतिशय कष्टाने ते जगत असतात, त्यांना या सहायक उपकरणांमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना अनेक बाबी सोप्या व त्यांचे जीवन काही प्रमाणात सुखर होणार आहे.
आमदार राजूभैया नवघरे यांनी दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे मिळण्यासाठी सातत्याने दोन वर्ष पाठपुरावा करून या शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामुळे या शिबिराचे अत्यंत महत्त्व आहे.
या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक विजय कान्हेकर साहेब, मा.नगराध्यक्ष अ.अफिज अ.रहमाण साहेब, डॉ. क्यातमवर साहेब, उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, समाज कल्याण अधिकारी जि.प. राजु एडके, प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, समन्वयक विष्णू वैरागड तसेच सभापती तानाजी बेंडे पाटील, सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालु मामा ढोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.