आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

111 मुलींच कन्यादान करणारा आमदार कोण

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

मुलीचं कन्यादान करण्याचं भाग्य ज्यांना लाभतो असा आमदार वसमत विधानसभेचे राजू भैया नवघरे यांना कन्यादान करण्याचं भाग्य एक ,दोन नव्हे तर 111 वधूंचे कन्यादान करण्याचा भाग्य लाभल आहे.

      वसमत विधानसभेला खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष आमदार म्हणून राजू भैया नवघरे ज्या वर्षी निवडून आले त्या वर्षी पासून आजतागायत विधानसभेतील  गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं खरं काम आमदार राजू भैया नवघरे करत आहेत.


वसमत विधानसभा मतदारसंघात रस्ते पाणी तसेच विविध विकास कामांचा धुमधडाका तसेच मंत्रालय यातून विविध विभागामार्फत करोडो रुपयांचा निधी खेचून आणून मतदार संघात विकासाची गंगा आणणारा आमदार राजू भैया नवघरे यांच्याकडे पाहिले जाते .


गेली दोन वर्षांपासून लाॅक डाऊन असल्यामुळे  शेतकरी असलेला माय-बाप अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला असताना त्यांच्या मुली च्या लग्नाचा मोठा प्रश्न कुटुंबा समोर असताना या कुटुंबाची सर्व जबाबदारी आमदार राजू भैय्या यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली दोन वर्षापासून कोरोना काळात बंद असलेला विवाह सोहळा यावर्षी मोठ्या थाटात होणार असून यावर्षी 111 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 14 मे रोजी दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र वाई गोरखनाथ  ता.वसमत येथे येथील होणार आहे .या कार्यक्रमाला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा होणार आहे


या कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ,आरोग्य मंत्री राजेश टोपे ,राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असून यामध्ये 111 जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे.


यामुळे 111 मुलींचे कन्यादान करण्याचा भाग्य वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांना लाभले असून मुुुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य अनेकांना लाभत नाहि ते भाग्य आमदार राजु भैय्या नवघरे याना लाभल आहे. असे  वसमत विधानसभा मतदार संघातील जनतेतून बोलले जात आहे यामुळे कन्यादान करण्याचा खरे भाग्य लाभले ते  आमदार राजु भैैैया यांना  .

   या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून आज या कार्यक्रमाची  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह पोलिस प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!