आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सध्याचे सरकार 40 आमदारांच्या विकासासाठीच -जयप्रकाश दांडेगावकर
रामु चव्हाण

प्रतिनिधी : प्रविण वाघमारे
वसमत :
येथील जिंतूर फाटा येथे मंजूर झालेले माॅडन मार्केट या मार्केटला राजकीय हेतूने खासदार साहेब खोडा घालत असल्याचे सांगत आज दि 2 आक्टोबर रोजी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजुभैय नवघरे यांनी दांडेगावकर यांच्या फार्म हाऊस वर पत्रकार परिषद घेण्यात आली या वेळी मॉडन मार्केट मुळे परिसरातील जवळपास 5 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता,शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळनार होता.राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातील व्यापारी या मार्केट मध्ये खरेदी विक्री साठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले असते, या मार्केट मध्ये मालाची खरेदी विक्री,ग्रेडींग,पॅकींग,ट्रासंपोटीग अशा सगळ्या सुविधा एकाच जागी उपलब्ध होणार असलेले मार्केट या मार्केट साठी दांडेगावकर व आमदर नवघरे यांनी पाठपुरावा करून 66 एक्कर जागा सुध्दा लिज वर घेतली होती पण आता त्या जागेवर हळद संशोधन केंद्र उभे करण्यासाठी खासदार साहेबांनी सध्याच्या सरकारच्या मदतीने मॉडन मार्केट ज्या 66 एक्कर जागेवर होणार होते त्या जागेवर हळद संशोधन केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.व सरकारने घाईघाईने तसे आदेश हि निर्गमित केले ज्या मुळे वसमत च्या विकासाला नक्कीच खीळ बसणार आहे.खासदार साहेब राजकीय द्वेशातून वसमत च्या विकासात का खोड घालत आहेत हे कळायला मार्ग नाही.असे साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.तर वसमत मतदारसंघांतील ऊस संशोधन केंद्र,केळी संशोधन केंद्र,या पासून किती रोजगार उपलब्ध झाला जर हळद संशोधन केंद्रामुळे 5 हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार असेल तर हळद संशोधन केंद्र करण्यात आमची काही हरकत नाही असा खोचक टोला आमदार राजुभैय नवघरे यांनी लगावला.सध्याचे सरकार हे केवळ 40 आमदारांच्या विकासासाठी व महा विकास आघाडी सरकारने घेतलेले चांगले विकासाचे निर्णय रद्द करण्याचेच काम करत असल्याचेच दिसत आहे.आहे असे हि ते म्हणाले.मतदार संघाच्या विकासासाठी व हिंगोली,परभणी,नांदेड च्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी आम्हि लोकशाही मार्गाने न्यायालयात जाणार आहेत वेळ पडलीच तर मतदारसंघातून एक मोठे जन आंदोलन उभारले जाईल असे सुतोवाच हि दांडेगावकर यांनी केले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तानाजी बेंडे,बालाजी ढोरे,सौरव जाधव,राजा कदम ,प्रविण शेळके, मोदी भैया,ऐन.आय.पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.