आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गोदावरी अर्बन पतसंस्थांपुढे दीपस्तंभ ठरेल- खा.शरदचंद्र पवार,

रामु चव्हाण

खा.शरद पवार यांच्याहस्ते गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयाच्या इमारतीचे उदघाटन

 

नांदेड :रामु चव्हाण

नांदेडला येण्यापूर्वी गोदावरी अर्बनचे कार्य कर्तृत्व ऐकून होतो, परंतु नांदेडला आल्यानंतर गोदावरी अर्बनच्या मुख्यालयाची पाहणी केली तेव्हा गोदावरीच्या कार्यावर खऱ्या अर्थाने विश्वास बसला, राजश्री पाटील ह्या गोदावरी अर्बनच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे. त्या अधिक सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. दहा वर्षाच्या काळात सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणे तसे सोपे नाही. परंतू गोदावरी अर्बनने ग्राहक आणि ठेवीदारांप्रति दाखवलेली सहानुभूती अतिशय स्तुत्य असून देशातील राष्ट्रयीकृत बँकांनी देखील गोदावरी अर्बन सारखी ग्राहकांना सहानुभूति दाखवण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष मा. श्री शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
गोदावरी अर्बनच्या ” सहकारसूर्य ” मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मा. श्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते शनिवारी ( ता.१४ ) करण्यात आले. यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी झाले होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील , नीती मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल , गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की, नांदेडनगरी श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या पराक्रमाची भूमि म्हणून जगभर ओळखली जाते, त्यानंतर शिक्षणात अग्रेसर असणारी भूमी म्हणून आणि आज गोदावरी अर्बनच्या कार्यकर्तुत्वामुळे नांदेडचे नाव देशभरात पोहचविण्याचे काम खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी केले असल्याचे स्पष्ट मत श्री पवार यांनी मांडले. तर यावेळी गोदावरी अर्बन बँकेच्या सहकारसुर्य इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झालेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आजच्या घडीला सहकार क्षेत्रात यश मिळवणे तसे फारच कठिण झाले आहे. असे असताना देखील गोदावरी अर्बनने १० वर्षाच्या काळात अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. हे यश म्हणजे संस्थेच्या नेत्रत्वावर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास असून, खासदार हेमंत पाटील हे राज्याच्या हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यासधोरण समितीवर अध्यक्ष म्हणून ते अतिशय सुक्ष्मपणे अभ्यास करत आहेत. त्यांच्या या अभ्यासाचा देशाला फायदा होईल, सहकार क्षेत्रात महाराष्ट्राची मुख्य भूमिका राहिली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन केंद्र उभारणीसाठी केंद्राकडे पाठरपुरावा केल्यास त्यातून मराठवाड्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास देखील मंत्री श्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त करताना सहकार क्षेत्र हे देशाला आर्थिक सुबत्ता निर्माण करुन देणारे क्षेत्र आहे व त्यासाठी लागणारा पैसा सहकारातुन उभारला जाऊ शकतो असे ते म्हणाले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, गोदावरी अर्बनची सुरुवात तीन लाखावरुन झाली आणि दहा वर्षात ती सोळाशे कोटीवर पोहचली आहे. याचे कुठेही गणित नाही. मात्र ग्राहकांचा बँकेवरील विश्वास हे या गणिताचे मुख्य सुत्र आहे असे ते म्हणाले. खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी नांदेडला उभारलेल्या सहकारसुर्याच्या मुख्य इमारतीकडे बघुन सर्वांनी याची दखल घ्यावी अशी देखणी इमारत नांदेडात उभी केली असल्याचे ते म्हणाले. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी प्रास्ताविक करताना बँकेची मागील दहा वर्षातील प्रवासाची माहिती दिली, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर , दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे ,माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ. मोहन हंबर्डे , आ. भीमराव केराम , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अनुसया ताई खेडकर , माजी आ. प्रदीप नाईक , माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार अनिल कदम, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी आमदार रोहिदास चव्हाण, ऍड. शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को – ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर, यांच्यासह गोदावरी अर्बनच्या पाचही राज्यातील शाखांचे शाखा व्यवस्थापक , अधिकारी कर्मचारी सह हिंगोली, नांदेड, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील गोदावरी अर्बनचे ग्राहक , ठेवीदार , सभासद , शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!