आपला जिल्हाताज्या घडामोडी
जिल्हा परिषद मैदानावर दारू पिणाऱ्यांवर होणार कारवाई-उप.अ.डाॅ सचिन खल्लाळ
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
वसमत तालुक्याचे वैभव असलेल्या जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी अनेक प्रकारच्या क्रीडाप्रकार खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळाडू सकाळपासूनच या मैदानावर गर्दी करत असतात. तालुक्यातील एकमेव क्रीडांगण असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात पण या मैदानाच दुर्दैव म्हणजे या ठिकाणी मद्य शोकीन सायंकाळ पासुनच या मैदानावर बसून येथेच्छ दारू ढोसत असतात दारू पिल्यानंतर दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडून निघून जात आहेत.
सकाळी या मैदानावर खेळण्यासाठी सराव करण्यासाठी खेळाडू येत असतात आणि खेळाडूंना या काचापासून इजा सुद्धा झालेली आहे .वारंवार नेहमीचाच हा प्रकार सुरू असून या प्रकरणात पत्रकार मोईन कादरी यांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने या मैदानावर स्वच्छता मोहीम राबवून दारू पिणा-यांवर कारवाई करण्याची तंबी उपविभागीय अधिकारी डाॅ सचिन खल्लाळ यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद मैदान येथे आज सकाळी सात वाजता वसमत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सिताराम मान्येवार, नगरसेवक धनंजय गोरे, अमजद खान उर्फ नम्मु, पत्रकार मोईन कादरी, पत्रकार रामू चव्हाण, स्वच्छता निरीक्षक कदम, विलास जाधव, अॅड राजा कदम, संदीप सूर्यवंशी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व तालुक्यातील सर्व खेळाडू यांनी संपूर्ण स्वच्छता राबून संपूर्ण मैदान स्वच्छ केले आहे आणि ठिकाणी असलेल्या काचा उचलून त्या जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडी मध्ये टाकण्यात आल्या. त्यावेळी अनेक खेळाडूंनी उपविभागीय अधिकारी व मुख्य अधिकारी यांच्याकडे समस्या सांगून त्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती यावर उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ आणि नगर परिषद मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी यापुढे जिल्हा परिषद मैदानावर नेहमी स्वच्छता ठेवण्यात येईल व दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल याबाबत संबंधित पोलिस प्रशासनाला पत्र देणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे
यामुळे यापुढे जिल्हा परिषद मैदानावर दारू पिणाऱ्यांची आता काही खैर नाही.