आपला जिल्हा

वसमत येथे एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा 

रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण

आज दिनांक ८ मार्च जागतिक महिला विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करुन महिलांचा सत्कार व गुण गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प वसमत येथे देखील जागतिक महिला दिन मोठ्या संख्येने व मोठ्या हर्षोत्सवात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माया कदम,संगिता सोळंके, तर प्रमुख पाहुणे निलावंती चव्हाण, प्रभावती कदम, गंगा कदम, आशा टोमके, सुरेखा खंडागळे, द्रोपदा नादरे, आदी होते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा स्वागत – सत्कारानंतर उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नेमप्लेट देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांच्या चेह-यावर उत्साह दिसून येत होता. त्यानंतर काही महिलांनी मनोगत व गीत- गायण करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे आयोजन सी डी पि ओ सुप्रिया चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण उपस्थित महिलांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ अंजली राजू लोखंडे यांनी काव्यात्मक मधुर भाषेत करुन कार्यक्रमाची रूपरेषा रंगतदार केली व आयोजकांचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!