अर्धापूर तालुक्यातील चार धाब्यांवर अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
रामु चव्हाण

अर्धापूर तालुक्यातील चार धाब्यांवर अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
नांदेड / रामु चव्हाण
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये अर्धापुर परिसरातील ४ धाब्यावरील ४ धाबाचालक/मालक व ११ मद्यपींवर कारवाई करण्यात आली.
मा.डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, डी.डी.एच. तडवी, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नांदेड विभाग, नांदेड यांचे निर्देशा नुसार श्री. गणेश द. पाटील अधीक्षक रा.उ.शु. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड शहाराच्या परिसरात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नांदेड शहर व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड बीट क्र.१ यांनी दि.१८/०९/२०२४ रोजी रात्री केलेल्या कारवाई मध्ये १) हॉटेल मराठी तडका, नमस्कारचौक, नांदेड ता. जि. नांदेड २) हॉटेल खालसा नमस्कारचौक, नांदेड ता. जि. नांदेड ३) हॉटेल सह्याद्री पासदगाव रोड, पुयनी ता.जि.नांदेड, ४) हॉटेल राजेशाही, पासदगांव रोड, पुयनी ता. जि. नांदेड, चे मालक अनुक्रमे १) दत्ताहरी आनंदराव गायकवाड, २) सिध्दार्थ चंपतराव कांबळे, ३) नारायण गोविंदराव नागरगोजे, ४) जनार्धन हिरामन मिरकुटे हे आपल्या धाब्यामध्ये विनापरवाना तेथे येणा-या ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असतात अशा खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर धाब्यांवर दारुबंदी गुन्हेकामी छापा घातला असता चार धाबे चालक यांने अवैधरित्या व कसलाही दारुचा परवाना नसतांना विनापरवाना आपल्या मालकीच्या धाब्या मध्ये प्रत्येकी ३,३,३ व २ असे एकूण ११ ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी देवून आढळून आल्याने सदर ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९, चे कलम ६८
क, ख आणि ८४, अन्वये गुन्हा नोंदवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) गुन्हा र. क्र.७२/२०२४ दि.१८/०९/२०२४ मध्ये) हॉटेल मराठी तडका, नमस्कारचौक, नांदेड ता. जि. नांदेड येथील धाबा चालक दत्ताहरी आनंदराव गायकवाड, व मद्य पिणारे ग्राहक १) दिनेश कोंडीबाराव मगर, २) केशव विष्णु महाजन, ३) गंगाधर बोधाजी पांडागळे या आरोपींना मा. न्यायालय नांदेड हजर केले आहे.
२) गुन्हा र. क्र.८०/२०२४ दि.१८/०९/२०२४ मध्ये) हॉटेल खालसा, नमस्कारचौक, नांदेड ता. जि. नांदेड येथील धावा चालक सिध्दार्थ चंपतराव कांबळे, व मद्य पिणारे ग्राहक १) तानाजी विश्वनाथ सोळंके, २) अजय रंगराव देशमुख, ३) संदिप रामराव शिंदे या आरोपीना मा. न्यायालय नांदेड हजर केले आहे.
३) गुन्हा र. क्र.३०२/२०२४ दि.१८/०९/२०२४ मध्ये) हॉटेल सह्याद्री धाबा, पासदगाव रोड पुयनी ता. जि. नांदेड येथील धाबा चालक नारायण गोविंदराव नागरगोजे, व मद्य पिणारे ग्राहक १) साईनाथ शंकरराव मुंडकर, २) विजय शंकरराव मुंडकर,
३) सुधाकर पुरभाजी हारकरी या आरोपींना मा. न्यायालय नांदेड हजर केले आहे.
४) गुन्हा र. क्र.३०३/२०२४ दि.१८/०९/२०२४ मध्ये) हॉटेल राजेशाही धाबा तरोडा रोड पासदगाव ता.जि. नांदेड येथील धाबा चालक जनार्धन हिरामन मिरकुटे, व मद्य पिणारे ग्राहक १) विजय गणेश कल्याणकर, २) गजानन सोनाजी उराडे या
आरोपीना मा. न्यायालय नांदेड हजर केले आहे.
सदर कारवाई श्री. गणेश द. पाटील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली श्री. जावेद कुरेशी श्री. आशिष महिंद्रकर, श्री. सरकाडे, सर्व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, श्री.. सचिन शेट्टे, अमित वालेकर, रेणूका सलगरे, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, मानिका पाटील, संदिप देशमुख, श्रीमंत बोरूडे, अमोल शिंदे, श्री. नाईक, श्री.परते, टाकवाले दुय्यम निरीक्षक, श्री. शिवदास कुबडे, श्री. बळिराम इथरे सर्व दुय्यम निरीक्षक, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान आणि जवान-नि-वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांनी सदरील कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.
अधीक्षक यांचे अवाहन
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी चालक मालक यांनी अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी मध्ये शासन मान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाच वर्षा पर्यंत कारावासाची शिक्षा, किंवा रु. २५०००/- ते ५०,०००/- पर्यंत दंड, किंवा दोन्ही होवू शकते.
तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ८४ अन्वये एखादी ग्राहक/व्यक्तीने अवैध हॉटेल/धाबा/क्लब इत्यादी ठिकाणी मद्य प्राशन केल्यास त्यांना रु ५,०००/- पर्यंत दंड होवू शकतो. म्हणून “नागरीकांना अहवान करण्यात येते की, कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकसह मद्यसेवन करणा-या इसमा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल’असे आवाहन राज्य उत्पादन नांदेड गणेश द. पाटील अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांनी केले आहे.