ताज्या घडामोडीराजकीय
रविवारी वसमत येथे शिवसेनेचा संवाद मेळावा – तालुकाप्रमुख राजू चापके
वसमत / रामु चव्हाण

वसमत विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त शिवसेनेच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- तालुका प्रमुख राजु चापके
वसमत/ रामु चव्हाण
महाराष्ट्रात महाविकास आघाडी अंतर्गत होत असलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने शिवसेनेतून बंडखोरी करत वेगळा गट निर्माण केलेल्या शिंदे गटात महाराष्ट्रातील विविध आमदार हे गेले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद मेळाव्याचे आयोजन वसमत येथे करण्यात आल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके यांनी आज वसमत सि.टी.न्यूज शी बोलताना दिली.
दिनांक 26 जून रोज रविवार सकाळी दहा वाजता शिवस्मारक छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा असलेल्या शिव उद्यान येथे हा संवाद मेळावा आयोजित करण्यात असून या मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर,राजेंद्र शिखरे ( सहसंपर्क प्रमुख), युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका प्रमुख राजु चापके यानी दिली आहे तरी या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख,शहरप्रमुख,विभाग प्रमुख,जि.प,पं.स., कृषी उत्पन्न बाजार समिती,नगर परिषद,आजी माजी पदाधिकारी
तसेच शिवसेना अंगीकृत विविध संघटनेचे पदाधिकारी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे ,तालुकाप्रमुख राजु चापके ,युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यानी केले आहे.