ताज्या घडामोडी
शेतक-यांच्या कृषी पंपाची विज तोडणी तात्काळ थांबवा -आ.नवघरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
हिंगोली जिल्हा व वसमत विधानसभा मतदारसंघात यावर्षी प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस पडुन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अनेकवेळा विनंती करून व शेतकरी आक्रोश मोर्चे काढून हिंगोली जिल्हातील शेतकऱ्यांनी न्याय मागितला होता, पण आजतागायत त्यांना न्याय मिळालेला नाही.
अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असतांना व शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हवालदिल झालेली असतांना या बिकट परिस्थितीत महावितरण माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित करण्यात येत आहे.
महावितरणला वारंवार सूचना व विनंती करून ही ते वीज तोडणी विषयी शेतकरी विरोधी भूमिकाच घेत आहेत. यानुषंगाने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यासंदर्भात आमदार राजुभैय्या नवघरे यानी निवेदन दिले व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित न करता शेतकऱ्यांना थकबाकी भरण्यासाठी योग्य ते हप्ते पाडून थकीत रक्कम सुलभतेने भरता यावी अशी तजविज करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कृषी पंप चालवण्यासाठी अधिक दाब असलेला वीज पुरवठा व्हावा अशी विनंती केली.
महावितरण मार्फत कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे कृषी पंप जळत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिके असल्याने पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे कृषी पंपाची वीज खंडित करू नये व थकबाकी भरण्यासाठी सुलभ हफ्ते पाडून द्यावेत अशी मागणीचे निवेदन दिले आहे.
क