ताज्या घडामोडी
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध-डाॅ सचिन खल्लाळ
रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण
एक ऑगस्ट दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येते वसमत येथेही महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करत प्रमाणपत्राचे वाटप उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यामध्ये शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांना जास्तीत जास्त शासनाच्या योजनांचा फायदा कसा होईल याबाबत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत.

वसमत तहसील कार्यालयामध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात आला यानिमित्त तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट महसूल सहाय्यक म्हणून राहुल रेणुगुंटवार यांचा तर उत्कृष्ट सेवक म्हणून डि.जी मिरकुटे यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच यावेळी विविध प्रमाणपत्र जसे की जात प्रमाणपत्र ,उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इ डब्ल्यू एस, रहिवासी यावेळी सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप तसेच नवीन शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिकेचे वाटप यावेळी करण्यात आले
उपविभागीय अधिकारी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार मिळाल्याने वसमत महसूल प्रशासन आणि पत्रकारांतर्फे सत्कार.
वसमत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त त्याना पुरस्कार प्रदान करण्यात आला .त्याबद्दल आज महसूल सप्ताह निमित्त तहसील कार्यालयामध्ये महसूल कर्मचारी आणि पत्रकारांतर्फे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांचा सत्कार यावेळी करण्यात आला महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार व्हि. तेलंग ,पेशकार ,जि.चान्ने,एम.वाडीकर ,एस. काळे मॅडम , एस.बामनपल्ले , यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी ,स्वस्त धान्य दुकानदार,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते
तर पत्रकारांच्या वतीने पत्रकार रामू चव्हाण ,श्रीधर वाळवंटे ,नंदू परदेशी ,नागेश चव्हाण, अनिता चव्हाण आदींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
छाया – नंदू परदेशी श्रीधर वाळवंटे नागेश चव्हाण अनिता चव्हाण