
वसमत/ रामु चव्हाण
कुरुंदा येथे तिन दिवसांचा लॉकडाऊन
कुरुंदा येथील वाढता कोरोना कोविड १९ संसर्ग प्रादुर्भाव लक्षात घेता व मागील काही दिवसांपासून वाढत असलेली रुग्ण संख्या याबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार आज कुरुंदा येथे मा.तहसीलदार वसमत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सपोनि, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, सरपंच, उपसरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली त्यामुळे चर्चेअंती ठरले प्रमाणे दिनांक १७ जानेवारी २०२२ पासुन तिन दिवसांसाठी कुरुंदा येथील सर्व व्यापारी अस्थपना, बाजार ( संपूर्ण मार्केट) बंद ठेवण्यात येणार आहे.
तरी कुरुंदा येथील सर्व व्यापारी, दुकानदार, हॉटेल, चालक, सर्व अस्थपना चालक यांनी सदरील सुचनेचे पालन करून सहकार्य करावे. व गावातील वाढता कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सर्वांनी मास्क वापरणे, सैनिटायझर वापर करणे, आदी कोरोना बाबत नियमांचे पालन करावे.
असे आवाहन मा.तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आले.
कुरूंद्यात आज घडीला 21 रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून आल्याने कुरूंद्यात 3 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे ..जर रूग्ण वाढ झाली तर 7 दिवसाचे लाॅकडाऊन लावण्या बाबतचे आदेश तहसीलदार यानी दिले आहे.
*राजेश पाटील इंगोले*
सरपंच ग्रामपंचायत कुरुंदा
*सुनिल गोपीनवार*
सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुरुंदा
*आरोग्य अधिकारी*
प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुंदा