
वसमत/ रामु चव्हाण
#जे_का_रंजले_गांजले..#त्यास_म्हणी_जो_आपुले..!!
¶¶¶माणुसकी जपत आमच्या कु.सानवी चा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयात अन्नदान करून साजरा..!!¶¶¶
माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन पुसद च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या स्तुत्य उपक्रमात आज आम्ही खारीचा वाटा उचलला. निमित्य होते छोट्या भावाची मुलगी आमची लाडकी कु.सानवी हिच्या 5 व्या वाढदिवसाचे…
या उपक्रमासाठी आमचे आधारवड माझे वडील श्री नामदेवराव ठाकरे यांनी दुजोरा दिल्यानंतर आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुज्यनिय श्री सत्यपाल महाराजांचे शिष्य प्रबोधनकार मा.पंकजपाल महाराज यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या समवेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मा.मधुकरराव चव्हाण साहेब, विदर्भ ग्रामीण कोकण बँक शाखा पुसद चे व्यवस्थापक मा.प्रदीप बच्चूवार साहेब, मा.शरदभाऊ मैंद मित्र परिवारातील सदस्य श्री अमोलभाऊ व्हडगिरे (पत्रकार), मा.जयसिंग राठोड साहेब, श्री ऋषिकेश पंडितकर, श्री पृथ्वीराज चव्हाण,श्री अशोकराव जाधव सर, माझे स्नेही पं स.पुसद चे श्री दिलीप सारंगे साहेब, संभाजी पांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांडवा चे मुख्याध्यापक श्री प्रितम बेहरे सर, श्री अमित हटवार सर, श्री विष्णू डोरले सर,श्री हेमंत मेश्राम,श्री अविनाश रिंगणे सर,श्री राजू सूर्यवंशी यांचेसह ज्यांचा आज वाढदिवस इथेच साजरा झाला ते माझे स्नेही वैश्विक विकास संस्था मुळावाचे अध्यक्ष श्री अजयभाऊ झरकर उपस्थित होते..
रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान केल्यानंतर दवाखान्यातील प्रसूतीगृहात ऍडमिट असणाऱ्या माता भगिनींचा साडी चोळी, स्वेटर आणि फराळाचे पॅकेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक श्री दत्तात्रय जाधव काका, अध्यक्ष श्री गजानन भाऊ जाधव, सचिव श्री जगत रावल, सदस्य श्री संतोष गावंडे, यांनी उत्तम आयोजन केले..
या कार्यक्रमाला माझी अर्धांगिनी सौ.पूनम, मुलगी कु.अनवी, छोटा भाऊ अनिल आणि सौ.रुपाली ठाकरे सौ.हर्षा हेमंत मेश्राम,कु.प्रणवी मेश्राम,कु.सई सारंगे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण चि.आदित्य जाधव याने केले. या प्रसंगी उपस्थितांचे आभार मानून मी ऋण व्यक्त केले.. सुनिल एन.ठाकरे. पुसद.