
वसमत/ रामु चव्हाण
कुरूंदा पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलिस नाईक गजानन भोपे यांची पोलिस हवालदार पदी पदोन्नती झाल्याचे आदेश आज आले
त्या बद्दल त्यांचा वसमत येथे विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. यात वसमत विधानसभेचे आमदार राजु भैय्या नवघरे यानी त्यांचा सत्कार केला.
तर वसमत येथील पत्रकार संघटनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस पत्रकार पंकज नांदापूरकर ,संजय बर्दापूरे,फेरोज पठाण,अशोक गुंडाळे,आयुब पठाण, हरनामसिंग चव्हाण,प्रवीण वाघमारे,नाविद अहेमद,अॅड चंद्रकिरण डोंगरे,मोबिन सिद्दीकी,संदीप सुर्यवंशी,शे इलियास,सुनील ददगाळे आदी उपस्थित होते.