
वसमत/ रामु चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वसमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज शहरातून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही दिवसापूर्वी भ्याड हल्ला झाला असून हा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट आहे. पवार यांच्या घरा बाहेर सुरक्षारक्षक नसतात तसेच बाहेरही सुरक्षा यंत्रणा नसल्याने त्याचा गैरफायदा घेत हा पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे .देशातील जनतेला शरद पवार यांना दोषी असल्याचे दाखविण्याचा विघ्नसंतोषी प्रयत्न करत आहेत या कटाचा मास्टरमाइंड शोधून त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले आहे या निवेदनावर जयप्रकाश दांडेगावकर माजी मंत्री, आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे, चंद्रकांत बागल, त्रंबक कदम ,आयुब भाई पापुलर, बालाजी ढोरे, दौलत हुंबाड, सौरव जाधव ,रत्नमाला शिंदे ,मुनिता जाधव, साखरे ताई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.