वसमत/ रामु चव्हाण
भारतीय जनता पार्टी ने देशातील 148 लोकसभा मदे त्यात महाराष्ट्र राज्यातील एकूण 18 लोकसभासाठी “लोकसभा प्रवास योजना” आखली आहॆ.त्यात हिंगोली लोकसभा प्रभारी पदी पक्षाने रामदास पाटील यांची नियुक्ती केली आहे.यापूर्वी हि जबाबदारी तुळजापूर चे आमदार राणा जगजीत सिंह यांच्याकडे होती,तर हिंगोली लोकसभा संयोजक म्हणून जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते यांच्याकडे जबाबदारी होती.
हिंगोली लोकसभेत सन्घटनात्मक बांधणी करण्यासाठी,मंत्र्याचे दौरे नियोजन, लाभार्थी योजना, सोशियल मीडिया,पक्षाचे लोकसभेतील विविध कार्यक्रम नियोजन आणि बूथ सक्षम करण्यासाठी भाजपाने नव्याने जबाबदारी दिलीआहॆ.
रामदास पाटील सुमठाणकर यांनी मागील वर्षापासून प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंन्तर बूथपर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक प्रवास करत आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे वसमत विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी होती.तिथं त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करत आहेत,आता त्यांच्यावर पूर्ण हिंगोली लोकसभामतदारसंघाची पक्षाने जबाबदारी दिली आहॆ.
रामदास पाटील यांचा बूथ कार्यकर्ता पर्यंतचा निरंतर प्रवास,प्रशासकीय अनुभव, संघटन कोवशल्य, युवा चेहरा यातून पक्षाचा अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहॆ.
भारतीय जनता पार्टी ने लोकसभा प्रवासयोजनेसाठी महाराष्ट्र राज्यचे हिंगोली, बुलढाणा, संभाजीनगर आणि चंद्रपूर यां क्लस्टर साठी मा केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव प्रमुख
महाराष्ट्र राज्य प्रमुख (संयोजक) म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे यांना, तर सह संयोजक म्हणून प्रमोदजी जठार,क्लस्टर प्रभारी म्हणून मंत्री भागवतजी कराड तर क्लस्टर सह प्रभारी म्हणून खासदर अनिल बोन्डे यांची नियुक्ती केली आहॆ.