वसमत / रामु चव्हाण
14 नोव्हेंबर रोजी बाल दिना चे औचित्य साधून वसमत येथील सुप्रसिद्ध रेनबो किड्स बाल रुग्णालयाच्या वतीने 14 व 15 नोव्हेंबर रोजी नवजात शिशु बालकांचे मोफत तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ वसमतकरांनी यांनी घेण्याचे आवाहन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर शारेक अहमद अहमद यांनी केले आहे
14 नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा करण्यात येणार आहे या बाल दिनाचे औचित्य साधून वसमत येथील कवठा रोड येथील रेनबो किड्स बाल रुग्णालयाच्या वतीने नवजात शिशु व बालकांच्या सर्व प्रकारच्या रोगांची मोफत तपासणी 14 व 15 नोव्हेंबर या दोन दिवसात मोफत रोग निदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार असून ही या तपासण्या मुंबई आणि नांदेड येथील बाल रुग्णांना तज्ञसेवा देऊन अनुभव प्राप्त केलेले डॉक्टर शारीक अहमद करणार असून यावेळी रुग्णांना आवश्यक असणाऱ्या थायरॉईड आणि रक्त तपासण्या कमी दरात करण्यात येणार असून या मोफत बालरोग तपासणी आणि रोगनिदान शिबिराचा लाभ वसमतकरांनी घेण्याचे आव्हान डॉक्टर शारिक अहमद यांनी केले आहे.