श्रीमद्-महावाक्य निरूपण तथा बेलापूर चरित्र निरूपण सोहळा, कुरुंदा, ता वसमत, जि हिंगोली येथे होत असलेल्या सत्संग सोहळ्यात
पंधरावा दिवस
शरणांगत कसे व्हावे या विषयावर आज सर्व भाविकांना निरूपण करण्यात आले.
एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय.आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळेझाक करुन , आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्यावर फोडायला तयार होतो . अमक्यातमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो , कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते , म्हणून दुसर्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो . आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो , तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे , तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही ; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे , आपण स्वत :ला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही . आपल्याला सर्व समजते , परंतु प्रयत्न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही . त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो , आणि वासनेतच आपला अंत होतो . याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे , आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे . “असे निरूपण करून आजचे सत्र संपन्न झाले.
कार्यक्रम संयोजक – सद्भावना फाउंडेशन (बोरी)