
वसमत/ रामु चव्हाण
वसमत नांदेड रोडवरील आसना नदीवरील असलेल्या पुलाजवळील कठडला भगदाड पडल्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवासांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वसमत तालुक्यात 8 जुलै रोजी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे आसना नदीला पूर आला असून या पुलावरून गेली सहा ते सात महिन्याच्या आत बनवलेल्या पुलाच्या कठड्यांजवळ भगदाड पडले असून यामुळे जीवित हानी किंवा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे .
सदरील गुत्तेदाराने एक वर्षाच्या आतच बनवलेल्या या पुलाला भगदाड पडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग च्या होणाऱ्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सदरील वसमत नांदेड किंवा औंढा नांदेड कडे जाणाऱ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहन चालकांनी आसना पुलावर जात असताना काळजी घ्यावी अशी आव्हान करण्यात येत आहे.