आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
गुंठेवारी दस्तनोंदणी ला परवानगी देण्याची मागणी- आमदार राजू भैया नवघरे
रामु चव्हाण

वसमत / रामु चव्हाण
गुंठेवारी व तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीत सुधारणा करून एक एकर च्या आतील गुंठ्याची दस्त नोंदणी करण्याची परवानगी मिळावी याबाबत आज वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन गुंठेवारीची दस्तनोंदणी सुरू करण्याची मागणी केली आहे.
गुंठेवारी व तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार सर्वे नंबर च्या लेआउट करून त्यामध्ये एक ,दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यात जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य लेआउट मधील एक ,दोन गुंठ्याची दस्त नोंदणी करता येते परंतु सदरील बाबीचा विचार करता सर्व बाबी खर्चिक व वेळखाऊ असून यातील अधिक जाचक अटी सामान्य शेतकरी किंवा सामान्य नागरिकांना न परवडणारे आहेत. वसमत विधानसभा ही दुष्काळी भाग असून राज्यातील दरडोई उत्पन्न सरासरीच्या सर्वात कमी असल्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघातील अल्पभूधारक यांना वैद्यकीय कारणास्तव तसेच मुला मुलींच्या विवाहाकरिता सदरील कायद्यातील तरतुदीत बदल करून एक,दोन गुंठ्याची दस्तनोंदणी परवानगी द्यावी याबाबतचे मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना देऊन गुंठेवारी पद्धती दस्त नोंदणी करण्याची परवानगी मिळावी याबाबत मागणी आमदार राजूभैय्या नवघरे यांनी केली आहे.