वसमत शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या शासकीय इमारती अंधारामध्ये असून यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्यासह मुख्य रस्त्यावर गवळी मारुती मंदिर ते बस स्थानक परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकावर लावण्यात आलेले पथदिवे गेली अनेक दिवसांपासून बंद असून याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे.सकाळी महिला, वृद्ध या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जात असून एखादी अप्रिय घटना घडू नये यासाठी लवकरात लवकर सदरील पथदिवे सुरू करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे