
माजलगाव/ रामु चव्हाण
18 डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय प्रभु यांची जयंती या निमित्ताने विविध ठिकाणी दत्तात्रय जयंती साजरी करण्यात येते .माजलगावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संचलित बालसंस्कार केंद्रामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी बाल रूपातील 3 बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे बालक साक्षात श्री दत्तात्रयांच्या बाल अवतारात प्रकटले. या बालकांना पाहण्यासाठी भक्तांची ही रेलचेल मोठ्या प्रमाणात झाली हुबेहूब दत्तात्रयांचे बालपण दिसणाऱ्या या बालकांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली .
यावेळी माता अनुसया यांच्या रूपामध्ये प्रांजल देशमुख या बालिकेने तर ब्रम्हा विष्णू महेश यांच्या रूपांमध्ये संस्कृती भंडारे ,पलक मालानी, आरोही लड्डा या बालकांनी प्रभू श्री दत्तात्रयांचे बाल आवतार साकारल्याने सर्व माजलगाव मध्ये या बालकांची ठिक ठिकाणी कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.