वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथे कार्यरत असलेले तलाठी संतोष देवराव पवार यांचा 28 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रताप जगन्नाथ क-हाळे या युवकाने चाकूने भोसकून त्यांना जखमी केले होते यातच त्यांचा मृत्यू झाला पण काही वर्तमानपत्रांमध्ये प्रलंबित फेरफारामुळे तलाठी यांचा खून झाला असल्याचे प्रेस नोट प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. ही बाब अत्यंत चुकीचे असून हल्लेखोर आरोपी यांचा जमिनी विषय कुठलाही फेरफार संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हता केवळ संशयामुळे संबंधित पवार तलाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदरील खून हा संशयामुळे झाला असुन प्रलंबित फेरफारामुळे तलाठी यांचा खून झाला असल्याचे चुकीचे प्रेस नोट वृत्तमान पत्रात प्रसिद्ध झाली असल्याचे वसमतच्या तहसीलदार सौ शारदाताई दळवी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे