
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 116 उमेदवारी अर्ज दाखल
वसमत/ रामु चव्हाण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज 23 नोव्हेंबर रोजी शेवटची दिनांक असून आज तब्बल 116 जणांनी आपले उमेदवार अर्ज आज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी तब्बल 116 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे बोलवलं जात असून यामध्ये उमेदवारी अर्ज छाननी आणि उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत किती उमेदवार आपले उमेदवार अर्ज मागे घेतात हे आता पहावे लागणार आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शिंदे वंचित बहुजन आघाडी यांच्या गटाने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे ,डुकरे, दुधमल आदी उपस्थित होते.
आज दाखल केलेल्या अर्ज खालील प्रमाणे आहेत.