कुरूंदा पोलिस स्टेशन येथील कार्यरत पांगरा शिंदे या गावचे बिट जमादार गजानन भोपे यांची बदली वसमत शहर येथे झाली.
कुरूंदा पोलिस स्टेशन अंतर्गत पांगरा शिंदे या गावचे बिट जमादार म्हणून कार्यरत होते गावातील तंटे,वाद हे गजानन भोपे यानी गावातच मिटवले,गणपती उत्सव,डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती,सह गावातील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ते सदैव तत्पर रहायचे.कुरूंदा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावातील नागरिक,राजकीय पुढारी,पत्रकार,पोलीस पाटील यांच्याशी नेहमी मिळून मिसळून रहाणारे पोलीस कर्मचारी गजानन भोपे कुणाचाही फोन आला की धावत पळत जाऊन प्रत्येकाचे काम करुन देण्यास ते नेहमी पुढे असायचे त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांची बदली वसमत शहर येथे झाल्याचे कळाल्यानंतर पांगरा शिंदे या गावच्या ग्रामपंचायत व नागरिकांनी प्रथमच ठराव घेऊन गजानन भोपे यांची बदली न करताच त्यांना पांगरा बिट मध्येच ठेवण्याचा ठराव घेतला होता हि जिल्ह्यातील पहिलीच घटना असेल जे की पोलीस कर्मचा-याच्या बदलीसाठी ग्रामसभेत ठराव घेतला असेल.
असे मनमिळाऊ कर्मचारी गजानन भोपे यांची बदली निमित्त निरोप समारंभ आज कुरूंदा पोलिस स्टेशन येथे घेण्यात आला.सदर बैठकीचे आयोजन गजानन मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुरुंदा, युवराज गवळी पोलीस उपनिरीक्षक ,
पोलीस उपनिरीक्षक सिद्दिकी,जगदगुरू तुकाराम महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष भोपाळे,न.प उपाध्यक्ष सिताराम म्यानेवार,गणेशराव काळे, दत्तरामजी इंगोले,ग
जमादार तुकाराम आमले,
जमादार बापूराव बाबळे,
बालाजी जोगदंड.,इमरान सिद्दिकी,संदीप करवंदे,शिवाजी शिंदे,शेख महबूब, हटकर मेजर, प्रकाश टार्फे,राजू ढेंबरे, विकास राठोड,संतोष पटवे, गजानन भालेराव शिवप्रसाद बुट्टे,सुरेश जाधव,स्वामी,पठाण,विकास राठोड पत्रकार इब्राहिम जहागीरदार,बालाजी काळे,मारोती काळे,प्रमोद नादरे,नजीब कुरेशी,विलास शिंदे,सह पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील,राजकीय पुढारी,पत्रकार,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.