उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे दररोज OPD मध्ये बाल रोग तज्ञ सेवा मिळत नसल्यामुळे बालकांची व त्यांच्यासोबत येणाऱ्या मातांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे कोरोन ा ळापासून बालकांची OPD सेवा बंद करून ती महिला रूग्णालयात सुरू करण्यात आलि. पण उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी अनेक माता महिला आपल्या बालकांना घेऊन येत आहेत पण बालकांची OPD सेवा या ठिकाणी नसल्याने ती महिला रुग्णालयात सुरू असल्याने वसमत शहरातून महिला रुग्णालयात ये-जा करण्यासाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय होत असल्याने एखाद्या बालकास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी न्यायचे असल्यास हे जिकरीचे जात असून उपजिल्हा रुग्णालयातच लहान मुलांसाठी OPD सेवा सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार राजू भैया नवघरे, मा.जिल्हाधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक यांना रुग्ण कल्याण समितीच्या वतीने देण्यात आले आहे या निवेदनावर मोईन कादरी यांच्यासह समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.