वसमत शहरातील गोरगरीब नागरिकांचे नगरपालिकेतील कुठल्याही अडचणी बिनधास्तपणे हक्काने सोडवून त्यांचं पूर्ण समाधान करणारा संदीप गोविंदराव इंगोले याच आज दुर्दैवी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालं.
वसमत शहरात कुठलाही घरकुलाचा लाभ असल्यास संदीप हमखास करून देतो अशी वसमत शहरांमध्ये सर्व नागरिकांची भावना होते संदीप म्हटलं की गरिबांचा घरकुल मिळवून देणारा खरा नगरसेवक म्हणून त्याला ओळखले जाते.
आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत दुखत असल्यामुळे वसमत येथून नांदेड कडे नेत असताना जिंतूर फाटा येथे त्याला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी ही वार्ता वसमत शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर आज साय.7 वा कवठा रोड येथील स्मशानभूमीमध्ये सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संदीप इंगोले चा 25 एप्रिल रोजी 40 वा वाढदिवस झाला सर्व मित्र परिवार नागरिकांनी सुद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा दिल्या पण दुर्दैवाने तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांच्या मनाला चटका लावून गेला आहे.