वसमत तालुक्यातील थोरावा येथे पिसाळलेल्या वानराचा हैदोस पहावयास मिळत आहे.
थोरावा येथे आज सकाळी दीड वाजण्याच्या सुमारास गावामध्ये एक पिसाळलेला वानर शिरला यामध्ये महालक्ष्मी सणानिमित्त घराबाहेर झोपलेल्या नागरिकांना चावा घेतला यामध्ये तीन जणांना नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे तर सकाळी सहा वाजन्याच्या सुमारास एका चिमुरडीला सदरील वानराने चावा घेतला आहे. यामुळे वन विभागाने तातडी याकडे लक्ष घालून सदरील वानराला जेरबंद करावे अशी मागणी होत असून सदरील वानर गावामध्ये मुक्त संचार करत असून गावक-यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.