वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ करूणा (पतंगे) देशमुख यांची प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली .
त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या अधिसभा सदस्य आहेत . प्रा डॉ करुणा देशमुख (पतंगे) यांची प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती झाल्या बदल संस्थेचे अध्यक्ष मा . जयप्रकाशजी दांडेगावकर , सचीव मा आ पंडितराव देशमुख , उपाध्यक्ष अँड मुंजाजीराव जाधव, संचालक अँड रामचंद्रजी बागल, संचालक प्रा अनिल नादरे,, व सर्व विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा डॉ करुणा देशमुख (पतंगे) यांचे वडील कै.रावसाहेब पतंगे हे देखील या महाविद्यालयाचे अनेक वर्ष प्राचार्य राहिलेत.त्याच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ मोठ्या पदावर असून ते अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
आता त्याच जागेवर प्र.प्राचार्य म्हणून त्यांची मुलगी प्रा डॉ करुणा देशमुख ( पतंगे) त्यांची आज न निवड झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.