कोतवाल भरती परीक्षा नुकतीच 27 ऑगस्ट रोजी होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे कोतवाल भरती परीक्षा 2023 साठी आवेदन पत्र ज्या परीक्षार्थीनी भरले होते त्यांना तहसील कार्यालयामार्फत तसेच पोस्टाद्वारे प्रवेश पत्र वाटप करण्यात आलेले आहेत परंतु ज्या परीक्षार्थींना अद्याप पर्यंत प्रवेश पत्र हॉल तिकीट प्राप्त झाले नाहीत अशांनी त्यांचे प्रवेश पत्र www.hingoli.nic.in या संकेतस्थळावरून दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपासून डाऊनलोड करता येतील जर प्रवेश पत्र डाउनलोड करणे संबंधी कुठलेही अडचण आल्यास वसमत तहसील कार्यालय येथे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला असून त्या कक्षात जाऊन आपण आपले प्रवेश पत्र हस्तगत करू शकता. जर प्रवेश पत्रावर माहिती मध्ये काही विसंगती असल्यास त्याची दुरुस्ती 24 व 25 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात करून मिळेल त्यामुळे आपण आपले प्रवेश पत्र मिळाले की नाही या संबंधित खात्री करून तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून आपले प्रवेश पत्र हस्तगत करावे. तसेच दिनांक 27 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी 9-30 वाजेपासून 10-30 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे त्यानंतर कुठल्याही परीक्षार्थीला प्रवेश देण्यात येणार नाही त्यामुळे आजच आपले प्रवेश पत्र मिळाले नसल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन वसमतच्या तहसीलदार सौ शारदा दळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.