हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एका रुग्णास कर्करोग आजार झाल्याने या रुग्णाच्या औषधोपचारासाठी श्री हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री राहत (कोष) निधीतून ३ लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली. त्यानंतर या रुग्णावर छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. रविद्र कोडलीकेरी मेमोरियल हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले.
श्री हेमंत पाटील हे देखील विद्यार्थी दशेपासून आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या गरजवंत रुग्णांच्या सेवेला नेहमी प्राधान्य देतात. रुग्णांची सेवा घडून यावी आणि रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी श्री हेमंत पाटील यांनी स्वतंत्र आरोग्य दूताची नेमणूक केली आहे. या आरोग्य दूताच्या माध्यमातून रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन केले जाते. रुग्ण आणि नातेवाईक घरातून निघाल्यापासून ते रूग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांच्याशी संपर्क ठेवला जाऊन समस्यांवर तोडगा काढला जातो.
वसमत येथील सय्यद नसिब इद्रिस अलम कादरी यांना कर्करोग आजाराचे निदान झाल्यामूळे त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे होते. यासाठी त्यांनी हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर श्री हेमंत पाटील यांनी सय्यद नसिब इद्रिस अलम कादरी यांना पंतप्रधान कार्यालयाकडून तातडीने आरोग्य व औषध उपचारासाठी मदत मिळावी म्हणून पत्राद्वारे लेखी मागणी केली होती.
त्यांच्या मागणीनंतर पंतप्रधान राहत कोष निधीतून संबंधित रुग्णाच्या उपचारासाठी ३ लक्ष रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यानंतर सय्यद नसिब इद्रिस अलम कादरी यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. रविद्र कोडलीकेरी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. उपचारानंतर ठणठणीत होऊन रुग्ण घरी परतल्यानंतर कादरी कुटुंबीयांनी हेमंत पाटील यांनी केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल आभार मानले.