वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयाला सक्षम वैद्यकीय अधीक्षक द्या…

वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयाला सक्षम वैद्यकीय अधीक्षक द्या…
*थेट आरोग्यमंत्र्याकडे मानवाधिकार सहायता संघाची मागणी*
वसमत येथील सतत काही न काही चर्चेत राहणारे उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पहावयास मिळत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय व रेफर पद्धत ही काही बदलत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील उपजिल्हा म्हणून ओळखले जाणारे वसमत शहर आहे शहरात लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून उपजिल्हा रुग्णालय देखील आहे.
परंतु या रुग्णालयात अप डाऊन करणारे डॉक्टर हे आपल्या सोयीनुसार ये जा करत असतात
रुग्णालयात असलेली बायोमेट्रिक मशीन धुळखात पडलेली आहे, तर आवश्यक ते औषध उपचार साठा देखील नाही. वैद्यकीय अधीक्षक हे उंटावर बसून शेळ्या हाकत असल्याने रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे पुन्हा पहावयास मिळत आहे . सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकारांनी या संदर्भात विचारपूस केली असता वैद्यकीय अधीक्षक हे उद्धट बोलत आहे आता या सर्व प्रकाराला कंटाळून मानवाधिकार सहायता संघाने थेट आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
आता आरोग्यमंत्र्यांनी ॲक्शन घेऊन सक्षम वैद्यकीय अधीक्षक द्यावे
अशी मागणीचे निवेदन मानवाधिकार सहाय्यता संघाचे प्रदेश सचिव (गुन्हे शाखा) नवीद अहेमद यांनी केली आहे.