हिंगोली लोकसभेचे माजी खा.तथा हळद संशोधन केंद्र चे अध्यक्ष हेमंत पाटील यांची राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली.आज त्यांचा शपथविधी आहे
तसेच त्याचा सोबत 7 सदस्य ही विधान परिषदेवर निवडले जाणार
<span;>- *आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नामनियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी*
<span;>- *उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ देणार*
*मुंबई दिनांक १५ ऑक्टोबर २०२४- महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील.विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सन्माननीय सदस्यांची नावे पुढीप्रमाणे – १) श्रीमती चित्रा किशोर वाघ २) श्री विक्रांत पाटील ३) श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड ४) श्री पंकज छगन भुजबळ ५) श्री इद्रिस इलियास नाईकवाडी ६) श्री हेमंत श्रीराम पाटील ७) डॉ श्रीमती मनीषा कायंदे यांचा समावेश आहे.