वसमत तालुक्यातील मौजे किन्होळा येथे सी व्ही रमण यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुंजाजी जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमात विविध विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन करण्यात आले.यावेळी प्रयोगाची प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रमाला माजी गटशिक्षणाधिकारी श्री. तानाजीराव भोसले साहेब (प्रमुख पाहुणे) हे उपस्थित होते त्यांनी मुलांना विज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावांतील नागरीक यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, यावेळी सर्व सदस्य, मुख्याध्यापक पंडित सर, टोकाई माध्यमिक विद्यालय किन्होळा येथील मुख्याध्यापक गोविंद जाधव सर व शिक्षक उपस्थित होते.