हिंगोलीत महसूल प्रशासनाची अरेरावी; संतप्त शेतकऱ्याने ग्राम महसूल अधिकाऱ्याची नोटीस थेट फेटाळली!
वसमत CT NEWS

हिंगोलीत महसूल प्रशासनाची अरेरावी; संतप्त शेतकऱ्याने ग्राम महसूल अधिकाऱ्याची नोटीस थेट फेटाळली!
वसमत CT NEWS
वसमत: शासनाच्या ‘बळीराजा शेत रस्ते’ योजनेला वसमत तालुक्यातील कन्हेरगाव येथे स्थानिक महसूल यंत्रणेनेच खो घातला आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तक्रारदार शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याची (सज्जा माळवटा) नोटीस संतप्त शेतकऱ्याने थेट फेटाळून लावली आहे.
मौजे कन्हेरगाव येथील गट क्र. १२३ मधील हक्काचा जुना रस्ता मोकळा करण्यासाठी शेतकरी हरनामसिंग चव्हाण व इतरांनी तहसीलदारांकडे दाद मागितली होती. तहसीलदारांनी तात्काळ कारवाईचे आदेश देऊनही स्थानिक पातळीवर मात्र शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. याच वादातून ग्राम महसूल अधिकाऱ्याने पाठवलेली नोटीस आज, २५ मे रोजी शेतकऱ्याने स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
“जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी किंवा दुसरे सक्षम अधिकारी स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहणी व कारवाई करत नाहीत, तोपर्यंत मला ही नोटीस अजिबात मान्य नाही!” असा आक्रमक लेखी पवित्रा अर्जदार हरनामसिंग चव्हाण यांनी थेट नोटीसवरच लिहून प्रशासनाला आव्हान दिले आहे. वरिष्ठांच्या आदेशाला जुमानणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर अरेरावी करणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



