आपला जिल्हासामाजिक

उद्या महापूजा, धोंडे जेवण व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन! आमदार राजूभैय्या नवघरे यांच्याकडून भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

संपादक: हरनामसिंग चव्हाण

उद्या महापूजा, धोंडे जेवण व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन!
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्याकडून भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वसमत:
पवित्र धोंडे महिन्याचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने उद्या, सोमवार दि. ०८ जून २०२६ रोजी एका विशेष धार्मिक आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र बाराशिव हनुमान मंदिर, बाराशिव येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे:
दक्षिणमुखी हनुमान बाराशिव अभिषेक व महापूजा: सोमवार सकाळी धार्मिक विधी आणि अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
भव्य हरी कीर्तन सोहळा: सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळेत विख्यात रामायणाचार्य ह.भ.प. नामदेव महाराज लबडे (पंढरपूरकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना साथसंगत म्हणून गायनाचार्य बाळासाहेब महाराज सुरेगावकर, कैलास महाराज पौळ, मृदंगाचार्य माऊली महाराज कदम आणि भजन सम्राट अशोक महाराज पाबळे टाकळगव्हाणकर हे उपस्थित राहणार आहेत.
धोंडे जेवण (महाप्रसाद): कीर्तनाची सांगता झाल्यानंतर दुपारी ०१:०० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत समस्त भाविकांसाठी ‘धोंडे जेवण’ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
निमंत्रक आमदार राजूभैय्या नवघरे यांनी वसमत मतदारसंघ तसेच परिसरातील सर्व हनुमान भक्त आणि नागरिकांना या कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. “आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे,” असे आवाहन निमंत्रक परिवाराकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
Don`t copy text!